इंदापूर ! चांडगाव येथील दलित वस्ती चा रस्ता अतिक्रमण केल्यामुळे तो खुला करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती इंदापूर यांच्या समोर आमरण उपोषण
इंदापूर प्रतिनिधी :-दत्तात्रय मिसाळ - चांडगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील दलित वस्तीतील लोकांच्या दळणवळण साठी असलेल्या गावठाणातील रस्ता गावाच्या नकाशा वरती आहे. परंतु सदर जागे वरती पवार व मदने यांनी अतिक्रमण करून तो रस्ता बंद केलेला आहे. रस्त्यामुळे भविष्यात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर रस्ता दलित वस्तीसाठी नकाशाप्रमाणे खुला करून देण्यात यावा. सदर अर्ज बाबत त्वरित कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी मौजे चांडगाव मधील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी दिनांक 15 मार्च 2022 रोजी पासून इंदापूर पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. रस्ता खुला करण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांना देण्यात आलेले आहे. माहितीसाठी परत जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार इंदापूर, प्रांत अधिकारी बारामती, इंदापूर पोलिस स्टेशन, अडवोकेट राहुल मखरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी यांना देण्यात आलेले आहे. निवेदना वरती आकाश साळवे, संजय गोपाळ साळवे, कविता संजय साळवे, उत्तम गोपाळ साळवे, वैजंता उत्तम साळवे, अश्विनी कानिफ साळवे, कानिफनाथ साळवे, महेंद्र साळवे, रवींद्र साळवे, राजेंद्र साळवे, अनिकेत सिद्धार्थ साळवे, सिद्धार्थ श्रिरंग साळवे, सीमा गंगाराम भोसले, मारुती भिमा भोसले, वामन मारुती साळवे, संगीता वामन साळवे, संतोष गौतम नाईक, सुधीर गोरख साळवे, आनंद गौतम नाईक, अविनाश सदाशिव आरडे, या ग्रामस्थांनी सह्या केलेले आहेत.