बारामती ! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघ निवड चाचणी शिबीराचे आयोजन
बारामती - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड (MCAD) मार्फत दिनांक २१ व २२ एप्रिल २०२२ रोजी बारामती, जि. पुणे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघ निवड चाचणी शिबीराचे आयोजन करणेत आलेले आहे. या शिबीराचे उद्घाटन श्री. दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी यांचे हस्ते व श्री. धीरज जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू. गिरीष शेवते. अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड,. मोहन लाड,पाणी फौंडेशन, पश्चिम विभागीय समन्वयक यांचे उपस्थितीत पार पडले आहे. यावेळी उपविभागीयअधिकारी यांनी सदर शिबीरासाठी सहभागी दिव्यांग खेळाडूंचे विशेष आभार मानून खेळासाठी आपली तंदुरुस्ती आवश्यक असून त्याकरिता नियमित सराव करणे आवश्यक असलेबाबत सांगितले.
त्याचप्रमाणे गिरीष शेवते यांनी संघटनेबाबत आणि पुढील स्पर्धाबाबत माहिती देऊन या
शिबीरामधून निवड खेळाडूंना यापुढील कालावधीमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये महाराष्ट्र
दिव्यांग संघातून विविध स्तरावरील राष्ट्रीय सामने खेळावयास मिळणर असलेबाबत सांगितले. तसेच
श्री. धीरज जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी सदर शिबीरासाठी सहभागी खेळाडू यांनी कोणतेही
दडपण न घेता उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यास महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची उत्तम संधी प्राप्त होईल.तरी सर्व खेळाडूंनी आपला उत्तम खेळ करावा असे नमूद केले. सदरचे कार्यक्रमास संपुर्ण महाराष्ट्रातून एकुण ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून सदरचे कार्यक्रमास बारामती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अविनाश शिंदे, हेड कोच . विजय शिंदे, निवड समिती सदस्य जीवन विरकर तसेच महाराष्ट्र दिव्यांग संघाचे . दिलीप भाई लोखंडे,. विजय गायकवाड,. विश्वजीत ननावरे, सचिव सातारा जिल्हा पॅरालिपीक संघटना व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहन लाड यांनी सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.