Type Here to Get Search Results !

गुढीपाडव्याचे मुहूर्तावर तिसंगीतील श्री महादेव मंदिरात गुढी पूजन आणि किर्तन सेवा संपन्न.

गुढीपाडव्याचे मुहूर्तावर तिसंगीतील श्री महादेव मंदिरात गुढी पूजन आणि किर्तन सेवा संपन्न.
संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी प्रभात फेरी द्वारे संस्कृती जतनाचा संदेश घराघरात पोहोचला.
अकलूज  : गुढीपाडव्याचे मुहूर्तावर तिसंगीतील श्री महादेव मंदिरात गुढी पूजन आणि किर्तन सेवा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाली.गुढीपाडवा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून
पंढरपूर तालुक्यातील आस्था प्रतिष्ठान आणि तिसंगी ग्रामस्थांच्यावतीने तिसंगी तील श्री महादेव मंदिरात शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता गुढी चे पूजन आणि किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय धर्मपीठ न्यास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री ह.भ.प मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांनी "लुप्त होतं चाललेली भारतीय संस्कृती"या विषयावर आधारित किर्तन केले. याप्रसंगी ज्येष्ठ गायनाचार्य व विणेकरी ह.भ.प. विठ्ठल महाराज शिंदे तिरवंडीकर यांचेसह परिसरातील भजनी मंडळातील मृदुंगाचार्य, आणि टाळकरी यांनी कीर्तनाला साथ केली.
किर्तन झाल्यानंतर नजीकच्याच श्री मारुती मंदिरात परंपरेनुसार पाडवा वाचन भाकणूक झाली.
महाप्रसाद दाते म्हणून कामदेव पाटील (गुरुजी), सत्यवान कारंडे यांनी कार्यभाग सेवा तर किर्तनकार मानधनाची जबाबदारी राजकुमार किसनदेव पवार आणि उमेश गणेश राजपूत यांनी यशस्वीपणे पार पाडली. आपली संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने
कीर्तनाच्या आरंभापूर्वी तिसंगी गावातील मारुती मंदिरापासून सवाद्य प्रभात फेरी काढण्यात येऊन आपल्या भारतीय संस्कृती जतनाचा संदेश पोचविण्याचे कार्य ग्रामस्थांनी पूर्ण केले.ही प्रभात फेरीश्री महादेव मंदिर श्री दत्त मंदिर आणि परत श्री महादेव मंदिर या मार्गावरून काढण्यात आली. जागोजागी या प्रभात फेरी चे श्रद्धापूर्वक मानपान करीत सुवासिनी महिलांनी औक्षण केले.
ही प्रभात फेरी कृष्णकुंज निवासस्थानासमोर आल्यावर सौ अंजली राजकुमार पवार यांनी स्वागत करून औक्षण केले.
   तिसंगी गावाला धार्मिक दिशा देणारे कै. रामचंद्र लक्ष्मण पवार, कै. किसनदेव रामचंद्र पवार(गुरुजी), कै. विष्णुपंत रामचंद्र पवार, वयोवृद्ध श्री कारंडे इत्यादींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीतील तरुणाई तिसंगी गावातून पुढे येत आहे. राजकुमार किसनदेव पवार, अविनाश शिवाजी रुपनवर, मिलन विष्णुपंत पवार, दिनेश जवाहर लंगोटे, दिपक प्रकाश मासाळ, अक्षय शिवाजी रुपनवर, अमजद मौलासो।मुलाणी, उमेश गणेश रजपूत, कामदेव पाटील (गुरुजी), सत्यवान कारंडे इत्यादी युवकांच्या माध्यमातून तिसंगी आणि परिसरातून धार्मिक कार्यक्रमांच्या बाबतीत तरुणाई पुढे सरसावलेली आहे. आणि त्यांना मार्गदर्शक म्हणून सात देशांमध्ये आणि आठ भाषांमधून किर्तनसेवा बजावणारे आंतरराष्ट्रीय धर्मपीठ न्यास परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर यांची साथ लाभलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test