सोमेश्वर येथे 'आरोग्यम धनसंपदा हेल्थ अँड न्यूट्रिशियन सेंटर' चा उदघाटन समारंभ संपन्न.
सोमेश्वरनगर - सोमेश्वरनगर परिसरातील तरुणांनी आहार व जीवन शैली काळजी घेत आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे 'आरोग्य धनसंपदा हेल्थ न्यूट्रिशियन सेंटर' च्या उदघाटन प्रसंगी सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप बोलत होते ते म्हणाले की परिसरातील जास्तीत जास्त तरुण व जास्त वजन असणाऱ्या नागरिकांनी या सेंटरचा फायदा घ्यावा व आपले आरोग्य जपावे तसेच सुरू केलेल्या या सेंटरला शुभेच्छा देत त्यांचे सोमेश्वर परिसरात हे सेंटर चालू केल्याने कौतुकही केले.
या प्रसंगी वेलनेस कोच ओकार जगताप यांनी माहिती देत म्हणाले की सध्याच्या धक्का धकाधकीच्या व मानसिक ताण तणावाच्या जीवनात समाजातील प्रत्येक वर्गामध्ये आता आरोग्याच्या विविध समस्या वाढत आहेत . बैठी जीवनशैली वाढते वजन सकस व संतुलित आहाराचा अभाव या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाढते व कमी असलेले वजन हे विविध आजारांचा धोका दर्शक न्यारे आहे . अशा अनेक लोकांना या सुरू केलेल्या 'आरोग्य धनसंपदा हेल्थ अँड न्यूट्रिशन सेंटर' च्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केलेली आहे जे त्यांच्या आरोग्य विषयी काळजी करत होते, समाजात या बाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि आपले जीवन आरोग्य संपन्न करण्यासाठी आम्ही बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजेपूल येथे पॉलिटेक्निकल कॉलेज समोर डॉ सचिन शहा यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये 'आरोग्य धनसंपदा हेल्थ सेंटर न्यूट्रिशियन सेंटर'ची सुरुवात केली आहे.
तसेचसिनियर कोच कड यांनी आहाराविषयी शरीराची घ्यावयाची काळजी ते थोडक्यात समजून सांगत सध्या ती गरज आहे हे पटवून उपस्थित मान्यवरांना सांगितले .
या सेंटरचे उदघाटन समारंभ सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , संचालक ऋषी गायकवाड, वेलनेस सीनियर कोच संजय कड ,अश्विनी कड ,आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत, पंकज कारांडे यांच्या उपस्थितीत झाला.
सूत्रसंचालन रुपेश शिंदे यांनी केले तर आवर्जुन उपस्थित मान्यवरांचे आभार आरोग्यम धनसंपदा हेल्थ अँड न्यूट्रिशियन सेंटर कोच ओकार जगताप यांनी मानले.