अमेझिंग एसकेव्ही ८७ ग्रुपच्या वतीने कै. संजय शामराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी व्याहाळी वनक्षेत्रात सोडण्यात आले
इंदापुर प्रतिनिधी: दत्तात्रय मिसाळ - निमगाव केतकी, ता.४ ः येथील अमेझिंग एसकेव्ही ८७ ग्रुपच्या वतीने ग्रुपचे सदस्य व वर्गमिञ असलेल्या कै.संजय शामराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त आज व्याहळी हद्दीतील वनीकरणात असलेल्या पाणवठ्यांमध्ये वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी सोडुन मिञाच्या आठवणींना उजाळा दिला.
सध्या ऊन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने पशु पक्षांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज आहे.इंदापूर तालुक्यातील वनीकरणात चिंकारासह अन्य वन्यप्राणी व पक्षांची संख्या मोठी आहे.
सध्याची वन्यप्राण्यांची पाण्याची तीव्र गरज ओळखुन अमेझिंग एसकेव्ही ग्रुपने मिञाच्या पुण्यस्मरणा निमित्त वनीकरणातील अनेक पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडुन पशुपक्षांची तहान भागवली आहे.
या वेळी अमेझिंग ग्रुपचे भीमराव कांबळे, मोहन शिंदे, गोरख कचरे, महेश मोरे, संजय राऊत, हनुमंत जाधव, अतुल जौंजाळ, मनोहर चांदणे तसेच वनकर्मचारी दादा मारकड, राजु पवार व सुभाष राऊत हे उपस्थित होते.