Type Here to Get Search Results !

इंदापूर ! इंदापूर तालुक्यात दलित वस्ती नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लक्ष निधी मंजूर :- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर ! इंदापूर तालुक्यात दलित वस्ती नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लक्ष निधी मंजूर :- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
 इंदापुर  प्रतिनिधी:- दत्तात्रय मिसाळ इंदापूर पुणे  जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविंधासाठी २५ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ कोटी ५० लक्ष तर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून १० कोटी असे एकूण इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरि सुविधांकरित करिता २५ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असून निश्चित या निधीतून होणाऱ्या कामामुळे दलित बांधवांना चांगल्या प्रतिच्या सोयी सुविधा उपलब्ध होतील असेल भरणे यांनी सांगितले आहे.

कोणत्या गावाला कोणत्या कामासाठी किती निधी ? 

वालचंदनगर येथील १४३ चाळ येथे बंदिस्त गटार करणे दहा लक्ष रुपये,रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये, सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये,तर १४४ चाळ येथे बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये, रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये, सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.

तर वालचंदनगर येथील आंबेडकर नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 25 लक्ष रुपये, बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे. याशिवाय वालचंदनगर येथील मानेवस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.याचसोबत वालचंदनगर येथील लोहारवस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे.

या कामांशिवाय वालचंदनगर येथील गायकवाड वस्ती येथे  रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.यासोबत वालचंदनगर मधील तीन चाळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय वालचंदनगर मधील धवलपुरी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये तर सेवा काॅलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २५ लक्ष रुपये,बंदिस्त गटार करणे १० लक्ष रुपये,सौर प्रकाश व्यवस्था करणे ५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील अ.जा.वस्ती रस्ता काँक्रेटीकरण करणे २० लक्ष,साबळे वस्ती ९ ,साबळे वस्ती २, आणि साबळे वस्ती ४ येथे रस्ता काँक्रेटीकरण करणे साठी प्रत्येकी २० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. 

भरणेवाडी येथील खरात वस्ती येथील रस्ता काँक्रेटीकरण करणे साठी २० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. वडापूरी येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे सांस्कृतिक भवन बांधकामासाठी २० लक्ष,लासुर्णे येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधकाम साठी २० लक्ष आणि नवदारे येथील बुध्दविहार परिसरात सुशोबजिकरण करणेसाठी २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.तर 

तर तालुक्यातील अजोती येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये नवीन बौध्द विहार इमारत तसेच समाज मंदिराला कम्पाउंड वाॅल व बैठकी करिता कट्टा बांधकाम करणे या करिता १५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.तर शेटफळगढे येथील बौध्द विहार परिसरात स्वागत कमान बांधणे करिता १० लक्ष, तर भवानीनगर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधणे करिता ५५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

गिरवी येथे समाज मंदिर बांधणे २० लक्ष,कळाशी बौध्द विहार परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसवणे १० लक्ष, कडबनवाडी येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत जाधव वस्ती येथे समाज मंदिर बांधणे १० लक्ष, चांडगांव येथील बौध्द समाज मंदिर व मातंग समाज मंदिर सुशोभिकरण करणे १० लक्ष,सणसर येथील अशोकनगर,खवळेवस्ती आणि सोनवणे आवळे वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे करिता प्रत्येकी १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

निमसाखर येथील पिरवस्ती मातंग वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे १० लक्ष तर गावठाण समाजमंदिर परिसर सुशोभिकरण करणे १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.निरगुडे येथे सोनवणे वस्ती सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष तर गावठाणात सामाजिक सभागृह बांधणे २० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

लुमेवाडी निंबोडी येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे १५ लक्ष,तक्रारवाडी येथे अण्णाभाऊ साठे सभागृह बांधणे १५ लक्ष,डाळज नं.१ अंबिकानगर भोसले वस्ती सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष व अण्णाभाऊ साठे मंदिर सुशोभिकरण करणे १० लक्ष,गोतोंडी मोरे वस्ती नं.२ सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष,गिरवी येथे समाजमंदिर बांधणे २० लक्ष,अकोले येथे बौध्द विहार समाज मंदिर सभागृह बांधणे १० लक्ष,पोंधवडी अण्णाभाऊ साठेनगर येथे मातंग समाज मंदिर बांधणे १० लक्ष तर अण्णाभाऊ साठे परिसरात सुशोभिकरण करणे १० लक्ष,नरसिंहपूर येथे समाजमंदिर बांधणे २० लक्ष,काझड येथे मोरवाडा समाज मंदिर सुशोभिकरण व पेव्हींग ब्लाॅक बसवणे १० लक्ष,डाळज नं.३ देवकुळे भोसले वस्ती समाज मंदिर बांधणे १० लक्ष,हगारेवाडी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते ग्रा.पं.कार्यालय रस्ता काँक्रेट करणे १० लक्ष,जाचकवस्ती येथे समाज मंदिर बांधणे १५ लक्ष व लक्ष्मीमाता मंदिर समाजिक सभागृह बांधणे १० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर उध्दट येथील मातंग समाज मंदिर बांधणे व सुशोभिकरण करणे १० लक्ष,सपकळवाडी येथील मागासवर्गीय वस्ती येथे व्यायामशाळा बांधकाम करणे १० लक्ष व वाचनालय/अभ्यासिका बांधकाम करणे साठी १० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.ते बेलवाडी झोपडपट्टी रस्ता करणे व मातंग वस्ती येथे रस्ता करणे यासाठी प्रत्येकी १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कळंब येथील मागासवर्गीय वस्ती येथे वाचनालय/ अभ्यासिका बांधकाम करणेसाठी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत या गावांना मिळाला इतका निधी…

अंथुर्णे करिता ६३ लक्ष,काझड ६ लक्ष, गलांडवाडी नंबर 2 करिता १५ लक्ष,गोतंडी ते गावठाण मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याकरिता ५ लक्ष रुपये, चिखली करिता २१ लक्ष,जाचक वस्ती करिता ३० लक्ष, निंबोडी करिता २३ लक्ष,निमसाखर करिता ७० लाख रुपये, निरगुडे करिता ६ लक्ष तर पिटकेश्वर करिता २० लक्ष, पोंधवडी करिता ४० लक्ष तर तालुक्यातील बाभुळगाव करिता ३० लक्ष, बिजवडी करिता ७६ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत.

यासोबत बेलवाडी करिता 40 लक्ष तर बोरी करिता 142 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हसोबाची वाडी १२ लक्ष रणगाव करिता 80 लक्ष,रुई करिता ४७ लक्ष,लासुर्णे करिता १२० लक्ष, वरकुटे खुर्द ४० लक्ष,वालचंदनगर मधील लोहार वस्ती गायकवाड वस्ती 3 चाळ आंबेडकर नगर 143 आणि 144 चाळ करिता 70 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.व्याहळी २५ लक्ष,शहा ४२ लक्ष, शिंदेवाडी ६ लक्ष,शेटफळ हवेली २० लक्ष,सणसर १०८ लक्ष,सपकळवाडी ४९ लक्ष,सरडेवाडी ६ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यावेळी मंत्री भरणे म्हणाले की तालुक्यातील सर्वच घटकापर्यंत निधी देण्याचे  काम करत आहोत या मध्ये अजून काही गावांचा अनुषेश भरून निघणार आहे त्यामुळे अनेक गावातील कामे लवकरच मार्गी लागतील असेही या वेळी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test