सोमेश्वरनगर ! सोरटेवाडीच्या केंजळे कुटूंबानी जपला सासवडच्या सोपानकाका पालखी बैलजोडी चा मान..!
चौथ्या पिढीचाही उस्फूर्त प्रतिसाद...
II"माझ्या वडिलांची मिरासी गा देवा" II
II "तुझी चरणसेवा पांडुरंगा आई" II
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी पाठविण्यात येणारी बैलजोडी परंपरेला खंड पडू न देता चालूवर्षीही पाठविण्यात आली. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचा मान सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाला आहे. दरवर्षी केंजळे कुटूंब या सोहळ्यासाठी उत्साहात बैलजोडी पाठवतात.
शनिवारी दि १८ रोजी रोजी सोरटेवाडी (ता बारामती) येथील केंजळे वाड्यात बैलजीडीची पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे,पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,राष्ट्रवादी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभे हस्ते पुज्या पार पडली यावेळी सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड,माजी संचालक विशाल गायकवाड, जेष्ठ विजयकुमार सोरटे, मधुकर सोरटे, आत्माराम सोरटे, सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, विजय राजवडे,विठ्ठल गायकवाड, श्रीपाल सोरटे, सोमनाथ सोरटे, माणिक लकडे,होळ माजी सरपंच ओकार होळकर ,नंदकुमार मोकाशी, हनुमंत शेंडकर,तसेच केंजळे कुटूंबातील ज्ञानेश्वर केंजळे, विकास केंजळे,संकेत केंजळे, प्रसाद केंजळे, अरुंधती केंजळे, ऋचा केंजळे ,नितीन कुलकर्णी ,यांच्यासह सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. केंजळे कुटूंबातील कै.बापूसाहेब बाळाजी केंजळे हे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे बैलजोडी पाठविण्याचा आलेला मान आजही केंजळे कुटुंबाने जपला असून पारंपरिक पध्दतीने ही बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली. परंपरेने शनिवारी दि २५ रोजी , दुपारी १ वाजता "संत सोपानदेव महाराज" यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.



