Type Here to Get Search Results !

पुरंदर ! वाल्हे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन

पुरंदर ! वाल्हे येथे क्रिकेट सामन्यांचे आयोजन
पुरंदर प्रतिनिधी - खेळाडूंच्या शारीरिक कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने सागर भुजबळ युवा मंचाच्या वतीने वाल्हे (ता. पुरंदर) येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात व असंख्य खेळाडूंच्या उपस्थितीत युवा नेते सागर भुजबळ यांच्या हस्ते या सामन्यांचे उदघाटन करण्यात आले. या दरम्यान आयोजित कार्यक्रमात सागर भुजबळ म्हणाले ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य तथा देश पातळीवर पोहचविण्यासाठी अशा स्पर्धेच्या माध्यमातून वेळोवेळी प्रोत्साहन देणे तितकेच गरजेचे आहे.
तर स्पर्धकांनी देखील आल्हाददायी वातावरणात  क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरवात केल्याने ग्रामस्थांसह क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण  आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब मदने तसेच राहुल भोसले अजिंक्य घाडगे प्रशांत पवार समीर खवले आशिष पवार अक्षय लंबाते शंतनू नवले यांसह  शिवराय क्रिकेट क्लब,राजमाता ग्रुप, पाटील कॉर्नर,तसेच मोरुजींचीवाडी, कामठवाडी येथील क्रिकेट क्लबच्या कार्यकर्त्यांनी या सामन्यात सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test