Type Here to Get Search Results !

"मातीचा पाऊस पडत नाही!"

"मातीचा पाऊस पडत नाही!"
शतकानुशतके भारतात 4 ऋतू पाळले जात आहेत. हिवाळा, उन्हाळा, पाऊस आणि शरद ऋतू. पावसाळ्यात पावसाच्या रूपात पाण्याच्या  सरी पडतात. चार महिन्यांच्या उष्ण वातावरणानंतर, आकाशातुन पावसाच्या रूपात अचानक पाणी पडते, ज्यामुळे संपूर्ण भारतभर शांतीची लाट पसरते. आपण माणसांना पाण्याबद्दल खूप आदर आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी आपण सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आपण सर्व स्तरातून पाणी वाचवण्याचे काम करत आहोत.
दरवर्षी संपूर्ण भारतात पाऊस पडतो आणि आम्ही ते वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतो.
दुसरीकडे, मातीचा 1 इंच थर तयार होण्यासाठी 500 ते 1000 वर्षे लागतात. आणि तीच 1 इंच माती समुद्रात वाहून जायला 1 वर्षही लागत नाही. आणि गांभीर्याची बाब म्हणजे या मातीचा विषय आपण गौण मानतो. "पाणी वाचवणे ही आजची गरज आहे.", "पाणी अडवा, पाणी जिरवा" अशी काही वाक्ये भारतात खूप प्रसिद्ध आहेत.  मुळात ते असावे “माती अडवा. पाणी जिरवा.” किंवा “माती-पाणी वाचविणे आजची गरज.”
"मातीता पाऊस पडत नाही!" ही बाब प्रत्येकाच्या विचाराचा विषय बनवण्यासाठी आज माझ्या लेखाचा विषय आहे. आपण मानव आपल्या स्वार्थाने आंधळे झालो आहोत. शेतीमध्ये जास्त उत्पादन करण्यासाठी आपण रसायनांचा इतका वापर केला आहे की आपण मातीचे आरोग्य नष्ट करत राहिलो आहोत. आपली जमीन वाढवण्यासाठी आपल्या शेतातील बांध उद्ध्वस्त केले आहेत. या कारणांमुळे मातीची धूप होत राहिली आहे. औद्योगिक विकासासाठी आपण जमिनीत विष कालवत राहिलो आहोत. विकासाच्या आंधळ्या पट्ट्याने आपली इतकी दिशाभूल केली आहे की, हे कळूनही आपल्याला मातीसाठी काही करावेसे वाटत नाही. हजारो किमी रस्ते बांधण्यात आल्याने लाखो एकर सुपीक जमीन नष्ट होत आहे. वाढती लोकसंख्या आणि कमी होत जाणारी शेती, कमी होत जाणारी जंगले हे मानवतेच्या दुर्दशेचे कारण बनत आहेत. "World's Soil Resources Report-2015" नुसार, 2050 पर्यंत जगातील 90% सुपीक माती नष्ट होईल/ मातीची धूप होईल. मातीच्या नाशामुळे हवामानातील बदलही वाढत आहेत. 2050 सालची अंदाजीत लोकसंख्या 9.8 दशलक्ष असेल आणि 90% शेतजमिन नष्ट  झालेली असेल. त्यावेळी जगणे खूप कठीण होईल आणि यासाठी फक्त आम्हीच जबाबदार असू.
आपण सर्वांनी लवकरात लवकर माती संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. सर्वात लहान शेतजमिनीपासून ते कॅलिफोर्नियाच्या वाळवंटापर्यंत, सहारा वाळवंटापासून ते जगातील सर्व प्रमुख शहरांपर्यंत, मातीचे आरोग्य जतन करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
भारतातील आणि जगभरातील मोजक्याच समाजसेवी संस्था माती वाचवण्याचे काम करत आहेत. पण मर्यादित आर्थिक आणि सामाजिक मदतीमुळे ते कामात कमी पडतात. या संघटना सर्व बड्या राजकीय नेत्यांना, कोट्यधीशांना, विविध स्तरावरील औद्योगिक संस्थांना आर्थिक मदतीसाठी आपला मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकरणाची खोली फार कमी लोकांना समजते. जगातील प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला स्वबळावर माती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
झाडे लावणे, गवत लावणे, जुन्या आणि योग्य पद्धतींनी मशागत करणे, आपल्या शेतातील माती संवर्धन करणे, आवश्यक तेवढी जमीन वापरणे, औद्योगिक विनाश कमी करणे आणि मातीचे संरक्षण करणे हे आपल्या मातीचे संरक्षण करण्याचे काही सामान्य मार्ग आहेत.
सुखी आणि निरोगी जीवनासाठी पाणी, माती, हवा आणि पर्यावरण हे सर्व आवश्यक आहे. केवळ माती किंवा केवळ पाणीच नाही तर या सृष्टीतील सर्व घटकांचे संरक्षण करणे, त्यांना समृद्ध करणे हे मानवाचे महत्त्वाचे ध्येय असले पाहिजे. कारण मानवतेचा पाया सर्व लहानसहान घटकांवर अवलंबून  आहे. अली बेग वनराई, पुणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test