बारामती ! पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १३ जुलै रोजी
बारामती, दि. ११: बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी तालुकाच्या १४ गणातील आरक्षण सोडत १३ जुलै रोजी सकाळी ११ वा. कविवर्य मोरोपंत नाट्य मंदीर, नवीन प्रशासकीय भवन समोर, बारामती येथे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसिलदार बारामती करणार आहेत.
तसेच जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती सार्वत्रिक निवडणुकीची प्रारुप मतदार यादी १८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर २२ जुलैपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येतील. यादीवर द्यावयाच्या हरकती, सूचना तहसिल कार्यालयात मुदतीत सादर कराव्यात. प्राप्त हरकतीवर निर्णय घेतल्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक २९ जुलै असून जिल्हा परिषद व पंचायत समिती बारामती निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीस तालुक्यातील नागरिकांनी १३ जुलै रोजी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन, तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.