Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची जनरल कौन्सीलची सर्वसाधारण सभा व कार्यकारी मंडळाची सभा सोमेश्वर येथे संपन्न

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची जनरल कौन्सीलची सर्वसाधारण सभा व कार्यकारी मंडळाची सभा सोमेश्वर येथे संपन्न
बारामती - महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची जनरल कौन्सीलची वार्षिक
सर्वसाधारण सभा व कार्यकारी मंडळाची वार्षिक साधारण सभा गुरुवार दि.२१/०७/२०२२ रोजी
ब्रम्हचैतन्य कार्यालय, निंबूत, ता.बारामती, जि. पुणे येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी
प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे हे उपस्थित होते. यावेळी अविनाश आपटे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, कार्याध्यक्ष शंकरराव भोसले,
सरचिटणीस प्रदिप बनगे, कोषाध्यक्ष युवराज रणवरे, उपाध्यक्ष नितीन बेनकर, अशोक
बिराजदार, प्रदिप शिंदे, सयाजी कदम, सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, संजय पाटील,
योगेश हंबीर हे उपस्थित होते. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे,
सोलापूर जिल्ह्यामधील कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चास मान्यता देणे तसेच साखर कामगरांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करणेत आली. महाराष्ट्र राज्यातील सर्व साखर कामगारचि दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी साखर
कामगारांना १२% वेतनवाढ दिल्याबद्दल त्याचे अभिनंदनाचा ठराव मांडणेत येवून तो एकमुखाने
मंजूर करणेत आला. तसेच कामगारांचे १२% वेतनवाढीमधील फरकाची रक्कम त्वरीत देण्याची
मागणी केली तसेच प्रोव्हिडंट फंडाची रक्कम काही कारखान्यांनी कामगारांना दिली नसल्याने साखर आयुक्तांकडे निवेदन देण्याचे ठरले. सभेमधील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करणेत आले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पदाधाकान्यांचा यावेळी सत्कार बारामती तालुका कामगार सभेच्या वतीने बारामती तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकडे माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, तानाजी सोरटे, धनंजय खोमणे, संतोष भोसले, अजित शिंदे, विलास दानवले, हनुमंत भापकर व विशाल मगर यांनी केला. 
   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास जगताप यांना केले. आभार बाळासाहेब गायकवाड यांनी
मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test