Type Here to Get Search Results !

समाज मंदीराचे जागेतील अतिक्रमण त्वरीत हटविणेबाबत वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच यांना निवेदन.

समाज मंदीराचे जागेतील अतिक्रमण त्वरीत हटविणेबाबत वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच यांना निवेदन. 
वडगांव निंबाळकर - वडगांव निंबाळकर ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ८६ मध्ये ५० x ५० चौ. मी. ही जागा मातंग समाज मंदीरची आहे. सदर समाज मंदीराच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या इसम नामे प्रकाश बिरजू साळवे व इतर हे जबरदस्तीने अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत आहे. तरी सदर इसमांस विचारणा केली असता, समाजमंदिर परिसरात रहाणारे रहिवासी वसंत नारायण खड़े, संजय चिंतामणी खुडे, मिलींद जगन्नाथ खुडे यांस दमदाटी शिवीगाळ करून धमकी देत आहेत.
माझे कोणीही वाकडे करू शकत नाही मी येथेच बांधकाम करणार आहे. सदर विषयाबाबत न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास नोटीस बजावुन सदरचे अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम थांबविणे बाबत समज देण्यात आलेली होती. परंतु त्याने न्यायालयाचा अवमान करून आदेश झुगारून आज रोजी देखील समाज मंदीराचा नाम फलक पाडुन प्रकाश बिरजू साळवे व इतर हे जबरदस्तीने अतिक्रमण करून घराचे बांधकाम करीत आहे. 

तरी वसंत नारायण खुडे, संजय चिंतामणी खुडे, मिलींद जगन्नाथ खुडे यांना इसम नामे प्रकाश बिरजू साळवे व इतर यांचेपासुन जीवीतास धोका उत्पन्न झालेला आहे.
आम्ही आमच्या मातंग एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने तक्रार निवेदन देतो की, सदर इसम नाम प्रकाश बिरजू साळवे उत्तर याचेवर कडक कायदेशीर कारवाई करून संबंधीत बांधकाम करीत असलेले त्यावरील बंद करण्यात यावे असे विनंती अर्ज निवेदन दिले आहे .
 येणार्‍या ०१/०८/२०२२ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करावयाची असल्याने सदर बांधकामचा पडलेला राडा रोडा काढुन देवुन समाजमंदीराचा परिसर स्वच्छता करण्यात यावा.
अन्यथा मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मग होणाऱ्या परिणामाची  सर्वस्वी जबाबदारी  आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
अशा प्रकारचे निवेदन संबधित ग्रामपंचायत व सरपंच यांना देण्यात आले आहे.

कोणतेही मंदिर समाज मंदिर हे त्या त्या ठिकाणचा आस्थेचा विषय आहे. मंदिर असो समाज मंदिर असो या ठिकाणी प्रशस्त मोकळी जागा व स्वच्छता असणे गरजेचे आहे. 
स्थानिक समाज मंदिर परिसरात समाजातील काही कार्यक्रम असतील सार्वजनिक कार्यक्रम असतील जयंती उत्सव असतील हे करत असताना समाज मंदिर परिसरात जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे. 
सदर विषयात आम्ही सकारात्मक आहोत विचारांती योग्य निर्णय घेतला जाईल. 

 सुनिल ढोले, 
सरपंच वडगांव निंबाळकर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test