वडगांव निंबाळकर येथे साहित्य रत्न, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
बारामतीतील वडगांव निंबाळकर येथे मातंग समाज मंदिर वडगांव निंबाळकर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत वडगाव निंबाळकरचे सन्माननीय सरपंच सुनिल ढोले ग्रामपंचायत सदस्य पिंटू किर्वे तसेच वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सागर चौधरी, रामचंद्र खंडाळे(भाऊसाहेब) यांच्या हस्ते साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच एका नविन नामफलकाचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले.
याप्रसंगी संजय खुडे, मिलिंद खुडे, विलास खुडे, गणेश खुडे, संदीप खुडे, दत्ता खुडे, दत्ता घोलप, विनायक खुडे, बबलू खुडे संतोष गायकवाड, बाळा खुडे, राजेंद्र खुडे, चंद्रराव खुडे,किशोर खुडे, वंदना खुडे, रेखा खुडे, कालिका खुडे यांच्यासह
समाजातील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.