कळंब ! लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर
कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर ,उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे, प्राध्यापक डॉ. रामचंद्र पाखरे, प्राध्यापक डॉ. तेजश्री हुंबे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योत्स्ना गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक व पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळ हातावरती तरली आहे अशी गर्जना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा व विचारांचा वारसा जतन करणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांचा वारसा समाजात रुजला पाहिजे. लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी स्वतंत्रपूर्वकाळात समाजाच्या स्वातंत्र्यासाठी विचारांची क्रांती घडवली कामगारांचे बंड उभा केले आणि देशाला स्वातंत्र्य आणि कामगारांना न्याय हक्क मिळावे यासाठी लढा उभा केला अशा महापुरुषांच्या विचारांना समाजात नेहमी आदराच्या स्थान असते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे असे मत उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे यांनी व्यक्त केले. परिक्षा विभाग प्रमुख डॉ विजय केसकर ,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा कपिल कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत लोकमान्य टिळक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ सुहास भैऱट ,प्रा .ज्ञानेश्वर गुळीग, प्रा. रविराज शिंदे , प्रा. विनायक शिंदे व महाविद्यालयातील कला,वाणिज्य ,विज्ञान विभागातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर