फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मुख्यमंत्री यांनी केली पाहणी
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.