मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा यासाठी सोमेश्वर कारखान्याला दिले पत्र
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या आस्थापनापैकी
शासनाने निर्धारित केलेल्या मागासवर्गीयांच्या शिल्लक जागा राहिलेला अनुशेष भरण्यासाठी पत्र देण्यात आले कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव तसेच सर्व संचालक मंडळ यांचेकडे अर्ज करण्यात आला. त्यावेळी सर्व संचालक मंडळ यांनी लवकरात लवकर
माहिती घेऊन लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संचालक संग्राम सोरटे, प्रवीण कांबळे व ऋषी गायकवाड यांनी यामध्ये पुढे होत याबाबत माहिती घेऊ असे सांगितले. याप्रसंगी करंजे गावचे माजी उपसरपंच व प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, निंबुत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, करंजे गावचे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, शिवसेनेचे विभाग प्रमुख राकेश( बंटी ) गायकवाड, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी अनिल गायकवाड, मुरूमचे सचिन सोनवणे, बारामती तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनंत मोकाशी-पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष संतोष भिसे, रणजीत हुंबरे, नागेश गायकवाड,हर्षवर्धन हुंबरे सह करंजे सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवरही यावेळी उपस्थित होते.