न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती विद्यालयाचा ३३ वा वर्धापन दिन व संस्थेचे माजी अध्यक्ष कै. शिवाजीराव यशवंतराव भोसले (आण्णा)यांची ८३ वी जयंती विद्यालयात संपन्न
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती (वाकी ,चोपडज , कानडवाडी ता. बारामती )या विद्यालयाचा ३३ वा वर्धापन दिन व संस्थेचे माजी अध्यक्ष कै.शिवाजीराव यशवंतराव भोसले (आण्णा )यांची ८३ वी जयंती विद्यालयात संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते हे होते प्रमुख अतिथी माजी अध्यक्ष जि. प. पुणे सतीश खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर , बांधकाम सभापती, जि. प. पुणे प्रमोद काकडे देशमुख , श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगरचे संचालक लालासो नलवडे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शिवाजीराव भोसले. संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव मानसिंगराव जगताप. संस्थेचे संस्थापक मानद सचिव रमेश विठ्ठलराव भोसले. सर्व संचालक मंडळ. वाकी, चोपडज, कानाडवाडी ,पळशी, मोराळवाडी, या गावचे आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ व पालक , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार एस. जे. यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२२ च्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, भरविण्यात आले होते तसेच वृक्षदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते.
सुरेश मारुती गायकवाड (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र गुप्त वार्ता पुणे) यांनी १५१५१ व वाकी गावचे माजी उपसरपंच व यशस्वी उद्योगपती संभाजी पोपटराव जगताप यांनी विकास कामासाठी ११ हजार १११ रुपये देणगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शेंडकर एस .जी., कुतवळ आर.एम., तांबोळी वाय.डी.यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संस्थापक मानद सचिव रमेश विठ्ठलराव भोसले यांनी मानले.