सोमेश्वरनगर - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळेचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. परीक्षेत प्रविष्ट झालेले 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पैकी सर्वसाधारण प्रवर्गातून केयुर कदम (स.सा.287)आणि इतर मागास प्रवर्गातून उदयराज बनकर (इ. मा. 141) शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावी दरवर्षी प्रती विद्यार्थी १२ हजार प्रमाणे एकूण रु ४८००० शिष्यवृत्ती मिळेल.
संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत , प्राचार्या रोहिणी सावंत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.