करंजे विविध कार्यकारी सेवा सह संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा-२०२२ खेळीमेळीत.
सभासदांना ५% प्रमाणे लाभांश मंजुर.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या.ची वार्षिक सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभा
अध्यक्ष कृणाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि. ३० रोजी पार पडली.
सभेपुढील ९ (नऊ) विविध विषयांना वर चर्चा करत त्यास संचालक मंडळ सह सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले तसेच सर्वसाधारण 5% प्रमाणे लाभांश मंजुरी देत ऐनवेळी विषयांमध्ये शेतकऱ्याच्या जीवावर बेतलेल्या निरा डावा कालव्याच्या चाललेल्या अस्तरीकरण विरोधाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला तर पाटबंधारे खात्याला लवकरच निवेदन देणार असल्याचेही या सभेप्रसंगी सांगितले .
यावेळी अध्यक्ष कृणाल गायकवाड ,उपाध्यक्ष महेंद्र शेंडकर, करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड , सोरटेवाडी सरपंच दत्तात्रय शेंडकर, संस्था माजी चेअरमन बाळासाहेब गायकवाड,अनिल गायकवाड, शहाजी गायकवाड, ज्येष्ठ सभासद शिवाजी गायकवाड ,सुरेश शेंडकर ,बाळासाहेब शेंडकर, दिलीप गोलांडे,प्रकाश मोकाशी, विठ्ठल गायकवाड शशिकांत गायकवाड ,खंडू लकडे ,माजी उपसरपंच साहेबराव गायकवाड ,माजी व्हाईसचेअरमन हनुमंत शेंडकर,करंजेपुल माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेश शेंडकर,शिवाजी शेंडकर ,राजाराम शेंडकर, बाळासाहेब शेंडकर, मच्छिंद्र शेंडकर तर विशेष सहकार्य सोमनाथ गायकवाड ,श्रीकांत शेंडकर, लक्ष्मण लकडे ,योगेश गायकवाड यांनी केले तसेच आभार विद्यमान संचालक राहुल शेंडकर यांनी मानले.