निंबुतचे माजी सरपंच प्रगतशील बागायदार उदयसिंह काकडे यांना उत्कृष्ट ऊस उत्पादक पुरस्कार.
'सोमेश्वर' पुरस्कृत... रक्कम गरजू विध्यार्थीसाठी दान.
निंबुत - श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये
कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात सन 2020/2021 या वर्षा मध्ये एक एकर क्षेत्रा मध्ये सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सन्मान केला जातो काल निंबुत येथील प्रगतशील बागायतदार व निंबुत
गावचे माजी सरपंच उदयसिंह काकडे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 265 या जातीचा ऊस 105.7 टनिज काढल्याने कारखान्याच्या
सर्वसाधारण सभेमध्ये सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व्हाईसचेअरमन होळकर व सर्व संचालकांच्या उपस्थितीत उदय
काकडे निंबुत.( ता. बारामती) यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन व रोख स्वरूपात 25 हजार रुपये देऊन उत्कृष्ट ऊस
उत्पादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी बहुसंख्य सभासद, शेतकरी, महिला, कारखान्याचे कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय काकडे यांना उत्कृष्ट ऊस उत्पादक बद्दल मिळालेले रोख 25 हजार रुपये बक्षीस सोमेश्वर शिक्षण संस्थेतील शिक्षण घेणाऱ्या गरीब व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दान केले त्यांच्या या दानशूरपणामुळे सभासदातून त्यांचे कौतुक झाले.