सोमेश्वरनगर - बारामतीतील बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम अनेक राबविले जातात ,त्यामध्ये स्पर्धा परिषद स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध व्हावी म्हणून बहुजन समाजसेवा संघ करंजे येथे विद्येची देवता श्री गणेश चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 31 रोजी स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आले यामध्ये स्पर्धााा परीक्षेत उपयुक्त अशी सर्वव पुस्तक उपलब्ध आहेत विद्यार्थी साहेब पालकांनी बहुजन समाजसेवा संघ यांच कौतुक केले.हे वाचनालय कार्यालय चर्मकार समाज मंदिर करंजे यांच्या सहकार्याने उपलब्ध दिल्याने हे वाचनालय उभे झालेले असून त्यांचेही सहकार्य मोलाचे असल्याचे संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे यांनी उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आवर्जून सांगितले तर संघामार्फत सत्कारही आला.
याप्रसंगी बहुजन सेवा संघ करंजे अध्यक्ष सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर Adv. बाळासाहेब गायकवाड , संभाजी गायकवाड सर , माझी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,नितीन शेंडकर,शिवाजी शेंडकर , सोमनाथ सावंत ,चर्मकार मान्यवर समाजबांधव सह ,काका भडलकर, भाऊसाहेब हुबरे, पोलिस पाटील राजेंद्र सोनवणे तसेच पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमेश्वर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा लाभ घ्यावा असेही नम्र आव्हान अध्यक्ष हुंबरे यांनी केले.