करंजेपुल येथील सोमेश्वर इलेक्ट्रिकल्स व बॅटरी दुकानाची चोरी ; चोरट्यांनी तीन लाखांच्या बॅटऱ्या नेल्याची माहिती.
करंजेपुल( ता बारामती) येथील सोमेश्वर मंदिर रस्त्यालगत पिराचे मंदिर समोर दत्तात्रय किसन खैरे यांचे सोमेश्वर इलेक्ट्रिकल व बॅटरी
नावाचे दुकान गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यानी फोडून तब्बल ३ लाख रुपयांच्या बॅटऱ्या चोरट्यानी नेल्याचे दुकानदार खैरे यांनी बोलताना सांगितले तर दुकानाचे मागील गोडावणाचे कुलूप कटावणीने तोडून ही चोरी करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहिती मळत आहे तसेच . या बॅटऱ्या बाहेर काढत त्या एका हातगाड्यांवर ठेऊन त्या सोमेश्वर मंदिर दिशेने नेताना एक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाले आहे तसेच पुढे बाजार तळापुढे हतगाडी नेत पुढे दुसऱ्या वाहनाने या बॅटऱ्या नेल्या असाव्यात आणि ती हातगाडी तिथेच रस्त्यालगत चारीत फेकून दिली आहे . परंतु याच मार्गावर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामुळे ही चोरी लवकरच पकडली जाणर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.