कऱ्हानदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून लागले वाहू.
सोमेश्वरनगर - कऱ्हाटी ता.( बारामती) परिसरात यंदा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु गणपतीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना तारले गणपती नंतर झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला परिसरातील सर्व पाण्याचे स्रोत भरले असून कऱ्हा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. काऱ्हाटी परिसरातील माळवाडी, फोंडवाडा, लोणी भापकर, बाबुर्डी, जळगाव आदी गावांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील ओढ नाले खळाळू लागले आहेत. तसेच विहिरी देखील भरले आहेत.कऱ्हा नदीपात्रावरील सर्वच बंधारे ओसंडून होऊ लागले आहेत गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुग तोडणी त्रास होत आहे. आता पावसाने उसंत दिल्याने शेतातील कामे मार्गी लागत आहेत.
कऱ्हानदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून लागले वाहू.
September 15, 2022
0
Tags