प्रा.सचिन दुर्गाडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
पुरंदर प्रतिनिधी - पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा व्दारा संचालित एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने वाल्हे गावचे रहिवासी प्रा. सचिन दुर्गाडे यांना प्र. द. पुराणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेची माजी विद्यार्थीनी उषा लोहाडीया, संस्था विद्या संकुल समन्वयक व माजी प्राचार्या लक्ष्मी गिडवाणी जेष्ठ चित्रपट लेखक आबासाहेब गायकवाड, जेष्ठ कला शिक्षक पोपट भोसले अशा विविध मान्यवरांच्या हस्ते प्रा. सचिन दुर्गाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या दरम्यान प्रा. सचिन दुर्गाडे म्हणाले
प्र. द. पुराणिक यांना भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी विद्यालयात शिस्त, आतंरभारती उपक्रम, शाळेतील प्रत्येक वर्गात प्रांत योजना, स्वावलंबी सफाई योजना, मूल्यशिक्षणावर आधारित स्वच्छता, सदाचार आणि उपक्रमशिल शिक्षणाची पायाभरणी केली होती.त्यामुळे पुराणिक सरांच्या नावाने मिळणारा सन्मान हा शिक्षण क्षेत्रातील कार्यास प्रेरणा देणारा सन्मान आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार साक्षी योगी यांनी मानले.