शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तालुकानिहाय बैठकीचे आयोजन
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तर्फे शासकीय जिल्हास्तर, विभागस्तर तसेच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेड व शिरुर तालुक्यात २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजगुरुनगर, खेड, जुन्नर व आंबेगांव तालुक्यात दुपारी ३ वाजता गु. रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगांव, हवेली, मावळ व मुळशी (महानगरपालिका क्षेत्राबाहेरील) तालुक्यात २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता पी.आय.सी.टी. मॉडेल स्कूल, म्हाळुंगे, बारामती, दौड व इंदापूर तालुक्यात ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, भोर, पुरंदर व वेल्हे तालुक्यात १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता राजा रघुनाथराव विद्यालय, भोर, पुणे महानगरपालिका क्षेत्रात 3 ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, संत महानगरपालिका क्षेत्र तुकारामनगर, पिंपरी-पुणे- १८ येथे स्पर्धेबाबत बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीत शालेय क्रीडास्पर्धा बाबत माहिती व चर्चा ऑनलाईन प्रवेश, स्पर्धा शुल्क व वेब प्रणाली कामकाजाबाबत मार्गदर्शन, मनपा क्षेत्र जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणे, जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धा आयोजन मागणीपत्रे सादर करणे. क्रीडा विभागाच्या विविध योजना व उपक्रमाची व क्रीडा मार्गदर्शिकेची माहिती दिली जाणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुख, शारिरीक शिक्षण शिक्षक,क्रीडा मार्गदर्शक,खेळ संघटना यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.