"भैरवनाथ ग्राम विकास प्रतिष्ठान" ची दरवर्षी प्रमाणे निरा-शिवतक्रारवाडी ते तुळजापूर पायी वारी प्रस्थान.
निरा - पुरंदर तालुक्यातील भैरवनाथ ग्राम विकास प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप धायगुडे व त्यांचे सहकारी गेले बारा वर्ष नीरा-शिवतक्रार वाडी ते तुळजापूर दरवर्षी पायी वारी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी दर्शन आयोजित करत असतात याही वर्षी सोमवार २६ रोजी सकाळी शिवतक्रार वाडी येथे असणाऱ्या भवानी माता मंदिरात सकाळची पूजाआरती करून पायी वारीचे प्रस्थान केले आहे . यावेळी ग्रामस्थ मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ही पायी वारी नवरात्रउत्सव घटस्थापना सोमवार दिनांक २६ रोजी निरा-शिवतक्रार वाडी भैरवनाथ मंदिर येथून निघत असते व ती पुढील आठ दिवसात तुळजापूर ठिकाणी देवदर्शनासाठी पोहोचत असते असा हा पुढील दिनक्रम या प्रतिष्ठानचा असतो.