सोमेश्वरनगर ! निरा-शिवतक्रारवाडी ते तुळजापूर पायी वारीचे बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे स्वागत.
सोमेश्वरनगर - नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी पुरंदर तालुक्यातील भैरवनाथ ग्राम विकास प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप धायगुडे व त्यांचे सहकारी गेले बारा वर्ष नीरा-शिवतक्रार वाडी ते तुळजापूर दरवर्षी पायी वारी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी दर्शन आयोजित करत असतात याही वर्षी सोमवार २६ रोजी सकाळी शिवतक्रार वाडी येथून ही पायी वारीचे प्रस्थान झाले असून सकाळी दहा वाजता बारामतीतील सोरटेवाडी येथे आले असता या पायी वारीचे स्वागत सरपंच दत्तात्रय शेंडकर व आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांच्या शुुुभहस्ते करण्यात आले , यावेळी निरा दुरक्षेत्र चे पोलीस नाईक संदीप मोकाशी ,सोरटेवाडी माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू मासाळ ,पत्रकार विनोद गोलांडे , शिवतक्रारवाडी भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष संदीप धायगुडे व सहकारी तसेच इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.