बारामती ! माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभेहस्ते "मायेचा एक घास"..भारतीय जवानांसाठी दिवाळी फराळ ..बारामती ते जम्मू प्रस्थान..
"मायेचा एक घास...जवानांणासाठी.
बारामती - देशासाठी प्राणाची बाजी लावणारे तसेच आपण ज्यांच्यामुळे सुखाची झोप घेऊ शकतो अशा सीमेवरील जवानांसाठी "दिपावली फराळ अभियान” अंतर्गत पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित एक अभिनव उपक्रम' सीमेवर लढणाऱ्या सैनिकांन विषयी "मायेचा एक घास...म्हणून दिवाळी फराळ घेऊन जाणाऱ्या चारचाकीचे 'बारामती ते जम्मू' प्रस्थान माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते मंगळवार दि २५ रोजी सकाळी बारामतीतील येथील गोविंदबाग निवासस्थानापासून हिरवा झेंडा दाखवत प्रस्थान करण्यात आले. गेले सात वर्ष 'आधार सोशल ट्रस्ट' (सिंहगड धायरी पुणे) ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जवानांना दिवाळीत बनवणाऱ्या फराळाचा पहिला घास ट्रस्ट च्या महिला सदस्य भगिनी या देत असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून विविध जिल्ह्या तालुक्यातून जवानांना शालेय विद्यार्थ्यांनी दीपावली शुभेच्छा संदेश पत्र( ग्रीटिंग कार्ड ) हे तब्बल साडेचार हजार स्वरूपात पाठवण्यात आले.
'आधार सोशल ट्रस्ट'च्या माध्यमातून असे उपक्रम रबवताना आम्हाला एक प्रकारचे समाधान वाटते असेच विविध उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही वर्षभरात राबवत असतो अशी माहिती
ओबीसी सेल बारामती लोकसभा मतदार संघ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) संस्थापक / अध्यक्ष : आधार सोशल ट्रस्ट संतोष एकनाथ चाकणकर (धायरी सिंहगड पुणे) यांनी दिली.
या प्रसंगी 'आधार सोशल ट्रस्ट' चे सदस्य वरिष्ठ सदस्य भाऊसाहेब चांदगुडे, प्रदीप काकडे ,संतोष वांजळे ,राहुल मोरे ,अनिल जाधव, संदीप रायकर त्याचप्रमाणे महिला सदस्यांसह शेकडो कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.