सुपा ! दिपावली निमित्त सुपे गावातील पारधी समाजातील लोकांना मिठाई तसेच फटाके वाटप
सुपे प्रतिनिधी / सचिन पवार.
दिपावलीच्या सणासाठी सर्व ठिकाणी धामधूम सुरू असते प्रत्येकाच्या घरात आनंदी उत्साही वातावरण असते परंतु अनेक गावामध्ये समाजामध्ये काही कुटंबांना आपल्या अर्थिक परिस्थितीमुळे हा सण उत्सव साजरा करता येत नाही, अशा कुटूंबातील लहान सहान मुलांना फटाके खरेदी करणे अशक्य गोष्ट असते, हीच बाब लक्षात घेऊन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे तसेच बाबुर्डी गावचे युवा सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यानी सुपे गावातील असणाऱ्या पारधी समाजातील कुटूंबाना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली ,
तसेच या वंचित समाजातील लहाना मुलांना फटाकेही वाटप करण्यात आले, मिठाई आणी फटाके वाटप केल्याऩतर या समाजातील महिला तसेच लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ,आपण प्रत्येकाने माणुसकी या नात्याने या दिपावली निमित्त गरीब आणि गरजू लोकांना मदत केली ,तरच हा दिपावली सण खऱ्या अर्थाने साजरा होईल ,यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चांदगुडे यांनी सांगितले
याप्रसंगी नवनाथ चांदगुडे, दशरथ चांदगुडे,मनोज कदम, राजकुमार लव्हे उपस्थित होते