....आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला.
सोमेश्वरनगर - रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या वतीने बारामती शहरातील वंचित मुले,मुली आणि महिलांच्या समवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.याप्रसंगी बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय दरेकर, सचिव अरविंद गरगटे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंतराव पाटील, संचालक अलीअसगर बारामतीवाला,बारामती येथील बालगृह/ निरीक्षणगृहाचे संचालक इलियाज हवेलीवाला, अधीक्षक सुगंधा जगताप, चर्चेस ऑफ क्राईस्ट बॉईज होम बालगृहाचे प्रसाद गायकवाड आणि रोहिणी सोनवणे, शासकीय प्रेरणा महिला वसतीगृहाच्या अधीक्षक संपदा संत आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने बारामती येथील बालगृह/निरीक्षणगृह, चर्चेस ऑफ क्राईस्ट बॉईज होम बालगृह,शासकीय प्रेरणा महिला वसतीगृह या तीन संस्थांमधील मुलांच्यासाठी दिवाळीचा फराळ वाटप केल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.