लोणंद ! लोणंदचे ग्रामीण रुग्णालय नऊ वर्षांनंतरही कागदावरच रखडले...
लोणंद - लोणंद व पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य विषयी समस्या निवारण होनेकामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामाचे शहर असल्याने आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने दि. १७/०१/२०१३ रोजी शासन निर्णय क्रमांक - संकीर्ण २०१२ /प्र. क्र. १४१/आरोग्य ३ या आदेशाद्वारे ३० खाटांचे 'ग्रामिण रुग्णालय' लोणंद येथे मंजूर केलेले आहे. परंतु याबाबत आजपर्यंत कसल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. याविषयी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी वारंवार सातत्याने मा. जिल्हाधिकारी सो. सातारा, मा. जिल्हा शल्यचिकित्सक सो. सातारा कार्यालयाकडे तसेच माजी मुख्यमंत्री व विविध लोकप्रतिनिधी यांकडे पाठपुरावा केला आहे व सुरु आहे तसेच आंदोलने केली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र असलेली 58 आर व नगरपंचायत वतीने ठराव मंजूर केलेली मटन मार्केट ची 20 आर. अशी एकूण 78 आर. जागेवर हे रुग्णालय उभे राहु शकते परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून अपुर्ण जागेचे कारण देत लोणंद चे ग्रामीण रुग्णालय उभारणी प्रलंबित असुन फक्त कागदावरच राहिलेली आहे. ग्रामीण रुग्णालय उभारणी चे कामकाज लवकरात लवकर सुरू होऊन लोणंद शहरातील सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.