"सोमेश्वर"येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक तास वाचण्यासाठी कार्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामतीतील श्री सोमेश्वर वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक तास वाचण्यासाठी हा कार्यक्रम शनिवार दि १५ रोजी राबवण्यात आला, या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा वाघळवाडी येथील इयत्ता पहिली ते चौथी चे एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले होते , त्यांनी लहान लहान गोष्टींच्या पुस्तकांचा आस्वाद घेतला उदाहरण ... डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या अनेक महापुरुषांची पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली बालगुडे व उपशिक्षिका रंजना चव्हाण, अलका रसाळ तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल काळखैरे डी एस व सहाय्यक ग्रंथपाल जितेंद्र जगताप , लेखनिक सावंत एस टी उपस्थित होते.