सोमेश्वरनगर ! दिवाळीसाठी लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’वाटप.
सोमेश्वरनगर - प्रत्येक रेशन कार्डाच्या मागे चार शिध्याचे एक किट म्हणजेच "आनंदाचा शिधा" दिवाळीसाठी दिला जाणार असून पुणे जिल्ह्यात आनंदाचा शिधा पोहोचला आहे. सर्वत्र स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना हा शिधा वाटप केला जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी काेरोनाच्या संकटानंतर या वर्षी पहिल्यांदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असून राज्य सरकारने गरिबांना रास्त भावात एक शिध्याचे किट उपलब्ध केले आहे.
या अनुषंगाने बारामतीतील करंजेपुल येथील स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना हा शिधा वाटप करण्यात आला
या प्रसंगी करंजेपुल तंटामुक्ती अध्यक्ष तथा सहकार आघाडी बारामती भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नाना गायकवाड, कैलास शेंडकर , सुधीर गायकवाड मारुती गायकवाड ,नाना हाके उपस्थित होते