सोरटेवाडी येथे लाभार्थ्यांना "आनंदाचा शिधा"चे वाटप.
सोमेश्वरनगर - प्रत्येक रेशन कार्डाच्या मागे चार शिध्याचे एक किट म्हणजेच "आनंदाचा शिधा" दिवाळीच्या निमित्त महाराष्ट्र शासनाणे सर्वत्रच आनंदाचा शिधा पोहोचला आहे. सर्वत्र स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थींना हा शिधा वाटप केला जाणार असून राज्य सरकारने गरिबांना रास्त भावात एक शिध्याचे किट उपलब्ध केले आहे.
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील सोरटे यांच्या स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना "आनंदाचा शिधा" वाटप करण्यात आले , याप्रसंगी सोरटेवाडी ग्रामपंचायत मा.उपसरपंच तथा सदस्य विकास पवार , रेशनिंग दुकानदार शिवाजी सोरटे, लाभार्थी लहुजी कांबळे,आकाश सोरटे,मासाळ,करचे ,अशोक सोरटे उपस्थित होते.