"सोमेश्वर"चा मंगळवारचा आठवडे बाजार अचानक पावसामुळे पाण्यात.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यात करंजेपुल येथे मंगळवारी असणारा आठवडा बाजार अचानक झालेल्या पावसामुळे पाण्यात गेला आहे तर पावसाने ग्राहकांच्या बाजाराच्या वेळी सुरुवात झाल्याने ग्राहक ,व्यापारी नाराज झाले आहे. भाजीपाला व तरकारी विक्रेता यांचा माल पाण्यात गेलेले असून पावसाने बाजाराचा बाजारच मांडला आहे असे आठवडे बाजार आलेल्या ग्राहक महिलांनी भावना व्यक्त केल. मंगळवारी अचानक झालेल्या पावसामुळे बाजारासह शेती पिकातही पाणी साठलेले दिसून येत आहे, त्यामुळे छोट्या तरकारी पिकांचे नुकसान होणार असून काही बागायत भागातील उभ्या ऊस पिकास चांगला फायदा होणार आहे तसेच हा परतीचा पाऊस असाच राहिला तर खरीप पीक तसेच तरकरी पिके संकटात येणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी आपले व्यथा बोलताना मांडली.
..........
अचानक झालेल्या पावसामुळे बटाटा व कांदा चांगली विक्री होऊ शकली नाही,पावसामुळे आठवडे बाजारात गर्दी ही कामी आहे.
महिला बटाटाविक्रेती - स्वप्नाली गायकवाड