सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविदयालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा
सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविदयालयात पुणे जिल्हा आंतरमहाविदयालयीन खो-खो स्पर्धा दि. १० व ११ आक्टोबर २०२२ रोजी पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हयातून एकूण २४ महाविदयालयात २५८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मा. प्रमोदकाका काकडे देशमुख यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत काकडे-देशमुख महाविदयालय विकास समिती अध्यक्ष, व प्रसिद्ध उदयोजक आर एन (बापू) शिंदे, दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त श्री. संजय बोडरेसर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उदघाटनपर शुभेच्छामध्ये खेळाडूना खेलाडूवृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धा जास्तीत जास्त खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडव्यात अशा खेळाडूना शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट खो-खो क्रीडामार्गदर्शक संजय बोडरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना पुणे जिल्हयाच्या संघाने विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवावा. व विद्यापीठाच्या संघामध्ये जिल्हयाचे जास्तीत जास्त खेळाडूंची निवड होईल अशा पध्दतीने खेळ करावा असे सांगून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतामधे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे सर यांनी या स्पर्धा अत्यंत पारदर्शक होतील तसेच खेळाडूना मार्गदर्शकांना महाविदयालयाच्या वतीने दोन दिवस चांगल्या सुविधा पुरविल्या जातील असे आवाहन करून सर्व संघांनी उत्कृष्टपणे खेळाचे प्रदर्शन याठिकाणी करावे असे सांगितले.
महाविदयालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे यांनी उपस्थित सर्व खेळाडूना स्पर्धेनिमीत्त शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमधे रामकृष्ण मोरे महाविदयालय आकुर्डी या संघाने प्रथम क्रमांक मिळविला, पद्मनी जैन महाविदयालय पाबळ द्वितीय क्रमांक, बाबुरावजी घोलप महाविदयालय सांगवीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
याप्रसंगी दिग्वीजय जगताप , संकेत जगताप व्यवस्थापन समिती सदस्य विकासे केंजळे, सौ. सुजाता भोईटे, सतीश लकडे सहसचिव तसेच सुहास भैरट पुणे जिल्हा विभागीय क्रीडासमिती सचिव डॉ. सुनिल पानसरे, डॉ. विदया पठारे, प्रा. ऋषीकेश कुंभार सहसचिव पुणे जिल्हा विभागीय क्रीडासमिती हे उपस्थित होते. सचिव जयवंतराव घोरपडे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे-देशमुख यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व अशाप्रकारचे उपक्रम महाविदयालयात राबवावेत असे सांगितले. डॉ.बाळासाहेब मरगजे डॉ.श्रीकांत घाडगे प्रा.दत्तराज जगताप व कर्मचारी आदित्य लकडे,शुभम येळे,विकास बनसोडे ,प्रफुल काकडे,निखिल जगताप,यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.