सोमेश्वरनगर ! मु.सा काकडे महाविद्यालय जिल्हास्तरीय बॉल- बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाने म.ए. सो. वाघिरे विद्यालय, सासवड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॉल- बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागासाठी निवड झाली. संस्थेचे अध्यक्ष मा.सतीशभैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सहसचिव सतीश लकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रा. सुजाता भोईटे, उपप्राचार्य रवींद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस उपस्थित होते. बॉल बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी खेळाडू - मर्दाने अथर्व मच्छिंद्र, काकडे पारस संजय, डोईफोडे जयेश संतोष,
अथर्व सोमनाथ सुतार, येळे संज्योत मोहन, सोहम बाळासाहेब खिलारे. यशस्वी खेळाडूंना प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.