करंजे गावामध्ये शरदचंद्रजी पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी संपन्न.
शिबिरामध्ये ११५ लोकांचा सहभाग ,२४ चष्म्यांचे वाटप तर मोतीबिंदूचे १५ लोकांचे निदान.
सोमेश्वर-करंजे - महाराष्ट्राचा जाणता राजा पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार आणि सौ प्रतिभाताई शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित भव्य मोफत मोतीबिंदू निदान शिबिर व नेत्र तपासणी बुधवार दिनांक १४/१२/२०२२ ठीक १० वा विजयभाऊ सोरटे(व्यवस्थापक संचालक- राजहंस पतसंस्था सोमेश्वर) अभिजित काकडे (संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना).संग्राम सोरटे(संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना) ,सुचित्रा साळवे(सदस्य-वितरण व्यवस्थापन समिती बारामती) या मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले - प्रमुख उपस्थिती- बाळासाहेब शिंदे (उपसरपंच करंजे ) , करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,सामजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे ,जेष्ठ नागरिक संजय गोलांडे, वाकी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अनिल भंडलकर,कंरजे पंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शिबिरामध्ये ११५ लोकांनी सहभाग नोंदवला २४ लोकांना माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले मोतीबिंदूचे १५ लोकांचे निदान झाले.
आयोजन श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करंजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले.