सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयास.... बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सह-सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस,व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे-
१) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक (खुलागट) १७वर्ष
२) शेलार सिद्धेश किशोर- प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) ८०kg
३) घोडके रुपेश संतोष-प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) (१७वर्ष ७४kg)
४) लोखंडे नितीन मारुती-प्रथम क्रमांक(१९वर्ष, ७०kg वजन गट)
५) कारंडे वैशाली पांडुरंग-प्रथम क्रमांक (१९ वर्ष ५०किलो वजन गट)
६) टकले विशाल चंद्रकांत-प्रथम क्रमांक (१९वर्ष ५७किलो वजन गट)
७) जगताप सायली नारायण-द्वितीय क्रमांक (१७वर्ष ४६किलो वजन गट)
८) दामले जानव्ही अजय-द्वितीय क्रमांक (१७वर्ष ४३किलो वजन गट)
९) शेळके साई किशोर-द्वितीय क्रमांक (१७वर्ष ५७किलो वजन गट)
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.