Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २८०० रू न देता हक्काची एक रक्कमी २९०४/- रू प्र. मे.टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी :- सतिश काकडे


सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल २८०० रू न देता हक्काची एक रक्कमी २९०४/- रू प्र. मे.टन FRP तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करावी :-  सतिश काकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या कारखान्याचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम सुरू होवुन सव्वा महिना झालेला आहे. आजपर्यंत
कारखान्याने २ लाख ८२ हजार मे.टन गाळप केलेले असुन आज कारखान्याकडे ३ लाख साखर
पोती उपलब्ध आहेत आज साखरेचे दर ३८००/- ते ४०००/- रू प्रति क्विंटल आहेत. यानुसार
कारखान्याकडे सुमारे १२० कोटी रूपये उपलब्ध होतात. तरीही सभासदांची सुमारे ८२ कोटी F.R.P
रक्कम कारखाना देवु शकत नाही. रककम कारखाना बिनव्याजी वापरत आहे. कायद्या प्रमाणे
गाळप झालेल्या उसाला १४ दिवसात F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक आहे. परंतु मागील राज्य
शासनाने दोन टप्यांमध्ये F.R.P रक्कम देण्याबाबत केंद्रास शिफारस केलेली होती परंतु केंद्राने
याबाबत अध्यादेश न काढल्याने सोमेश्वर कारखान्यासह जिल्हयातील इतर कारखान्यांनी देखील पूर्ण F.R.P रक्कम देण्यास टाळाटाळ चालविली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील कारखान्यांनी एकरक्कमी F.R.P पुर्वीप्रमाणे केंद्रसरकारच्या २२/२३ च्या सुधारीत परिपत्रकानुसार जुन्या पध्दतीने वाढीव दराने दिली आहे. परंतु सोमेश्वर कारखान्याने आजपर्यंत का F.R.P दिली नाही? कारखान्यास सभासदांचे बिनव्याजी पैसे वापरायचे होते का? परवा राज्य सरकारने F.R.P एक रक्कमी देण्याचे धोरण जाहीर केले आहे तरी कारखान्याने आपल्या कारखान्याच्या चांगल्या आर्थिक परिस्थिती नुसार एकरक्कमी F.R.P२९०४/- प्र. मे.टन दि. १० डिसेंबर २०२२ अखेर सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह वर्ग करण्यात यावी अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने लेखी मागणी दि. १/१२/२०२२ रोजी केली होती व त्याच दिवशी कारखान्याने घाईघाईत पहिली उचल २८००/रू देवुन उसच्या पहिल्या उचलीची कोंडी फोडल्याची भासवुन सभासदांच्या डोळयात धुळफेक केलेली आहे. वास्तविक चालु हंगामाची F.R.P केंद्र सरकारने दि. १७/८/२०२२ रोजी नोटीफिकेशन काढुन एकरक्कमी F.R.P३०५० रू १०.२५ बेस धरून द्यावी. असे राज्य शासनासह कारखान्यांना कळविले आहे. (सोबत पत्र जोडत आहे.) सोमेश्वर कारखान्याने मागील ३ ते ४ वर्षात उच्चांकी भाव दिला आहे. तसेच चेअरमन
कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नाहीत नियमित कर्जे आहेत असे वारंवार सांगत आहेत. कारखान्याची नेट F.R.P  २९०४/- रू. प्रति मे.टन होत असुन सदर रक्कम एकरक्कमी सभासदांना मिळाल्यास सभासदांची सोसायट्यांची कर्ज एकरक्कमी भरता येतील व त्यामुळे जिल्हा बँकेच्या बिनव्याजी कर्जाचा त्यांना फायदा घेता येईल तसेच एकरक्कमी F.R.P रक्कमेमुळे वैयक्तिक कामे सभासदांना पुर्ण करता येतील. शाळा सुरू झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील फी, शेतीच्या मशागती,उसाची बांधणी, बी-बियाणे खरेदी व लग्न सराई अशा अनेक गोष्टींना सभासदांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांना पैशांची आवश्यकता आहे.
    तसेच चालु वर्षी सन २०२२-२३ या गाळप हंगामात कारखाना जादा गाळप क्षमतेने गाळप
होणार असुन साखरेचे, को-जन, उपपदार्थांचे जादा उत्पादन होत आहे. सध्या साखरेचे दर ४०००
रू. क्विंटल चे वर आहेत. तसेच उपपदार्थांच्या दरामध्ये केंद्रसरकारने सरासरी १० ते १५ टक्के वाढ
केलेली आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे भक्कम असल्याने मग कारखान्यास एकरक्कमी २९०४/- रू. प्रति मे.टन FRP व त्यावरील व्याज देण्यास काही अडचण येण्याचे कारणच नाही. तरी चेअरमन व संचालक मंडळाने एकरक्कमी FRP रक्कम दि. १० डिसेंबर अखेर सभासदांच्या बँक खात्यावर १५ टक्के व्याजासह वर्ग करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव शेतकरी कृती समितीस कारखान्याचा काटा बंद करावा लागेल. व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहील.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना २०२२/२३ F.R.P १०.२५ उताऱ्याला ३०५० रू केंद्राचा निर्धारीत भाव
सोमेश्वर कारखान्याची २१/२२ रिकव्हरी ११.९८५
११.९८ - १०.२५ = १.७३
१०.२५ = ३०५०रू वरील प्रत्येक पॉईंटला ३०५ रू
३०५ X १.७३ = ५२७.६५
३०५० + ५२७.६५ = ३५७७.६५
३५७७.६५ - ६७४.०२ २१/२२ तोडणी वाहतुक २९०३.६३ रुF.R.P
नेट F.R.P २९०४ रूपये


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test