Type Here to Get Search Results !

"कुलवंत वाणी दिनदर्शिका सन 2023" महिला भगिनी यांच्या हस्ते प्रकाशन..!"


"कुलवंत वाणी दिनदर्शिका सन 2023" महिला भगिनी यांच्या हस्ते प्रकाशन..!"

"कुलवंत वाणी दिनदर्शिका 2023 चे,महिला मेळावा 2023-पुणे मध्ये, महिला वर्ष 2023 चे औचित्य साधत,महिला भगिनी यांच्या हस्ते प्रकाशन..!"
वर्ष नवे,संकल्प पूर्तीचे,
सामाजिक बांधिलकीचे....!

सर्व समन्वयक,कुलवंत वाणी समाज ट्रस्ट द्वारा प्रकाशित

पुणे प्रतिनिधी
"कुलवंत वाणी दिनदर्शिका सन 2023"

          नविन वर्षाच्या निमित्ताने ऑनलाईन स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती.सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन ऑफलाईन स्वरूपात, " महिला मेळावा 2023-पुणे" मध्ये,महिला वर्ष 2023 चे औचित्य साधत, उपस्थित ज्येष्ठ व मान्यवर समाजभगिनी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात, दि.22 जानेवारी 2023 रोजी मांगल्य मंगल कार्यालय पुणे याठिकाणी करण्यात आले.

      तसेच "मकरसंक्रात वाण" म्हणून सदर दिनदर्शिका "हळदी कुंकू कार्यक्रमात" महिलांना यावेळी मोफत देण्यात आली. सदर दिनदर्शिकेत कुलवंत वाणी समाज ट्रस्टचे,भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ मधील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व योजना यांची माहिती तसेच आपल्या समाजातील समाजबांधव यांच्या व्यवसाय,उद्योग याविषयक जाहिरात देखील प्रकाशित केल्या  आहेत.सदर दिनदर्शिका या मेसेज सोबत प्रकाशित करत आहोत..!
       

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test