Type Here to Get Search Results !

"महिला मेळावा 2023-पुणे द्वितीय (दुपार) सत्र ....!" "महिला उदयोजकता,समाजाच्या विकासाची गरज..!"

"महिला मेळावा 2023-पुणे द्वितीय (दुपार) सत्र ....!"
 "महिला उदयोजकता,समाजाच्या विकासाची गरज..!"
 पुणे प्रतिनिधी
महिला मेळावा-द्वितीय(दुपार) सत्र मधील ठळक घडामोडी..
द्वितीय सत्रा करिता गौरवपूर्ण,प्रतिभावंत व्यक्तिमत्व,सन्मानीय श्रीमती सुरेखाताई राजीवशेठ साबळे (पुणे) यांची प्रेरणादायी उपस्थिती महिला मेळावा करिता लाभली.यावेळी त्यांचे स्वागत गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
संपूर्ण महिला मेळावा 2023:पुणे फोटोसेशन व व्हिडिओ शूटिंग करण्याची जबाबदारी मोशी(शिरूर) येथील समाजभगिनी सौ.गौरीताई गौरव कडेकर (आय.टी. इंजिनिअर) यांनी समर्थरित्या व यशस्वीपणे सांभाळली.
 दौंड कुलवंत वाणी समाज महिला उपक्रम माहिती  याचे सादरीकरण दौंड येथील समाजभगिनी सौ.नयनाताई सचिन गोलांडे यांनी केले. 

सासवड कुलवंत वाणी समाज ट्रस्ट- महिला विश्वस्त उपक्रम माहिती याचे सादरीकरण सासवड येथील समाजभगिनी श्रीमती प्रतिभाताई रंगनाथ महाजन यांनी केले. 
महिला गृहउद्योग पदार्थ वस्तू विक्री स्टॉल अंतर्गत,सौ.प्रियंकाताई गौरव गोलांडे,दौंड(उडीद पापड),सौ.स्वातीताई राजेंद्र गोलांडे,दौंड(आर्टिफिशियल ज्वेलरी) व सौ.पुजाताई अशोक बिडवे,रहाटणी,पुणे(सुबोध एंटरप्रायजेस-केमिकल विरहित गुळ व पदार्थ) यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 रेगजिन बॅग निर्मिती-या व्यवसाय विषयक माहिती व स्व अनुभव अहमदनगर येथील समाजभगिनी सौ.सपनाताई विशाल तांबोळी यांनी सांगितले. 
                 
उरुळीकांचन कुलवंत वाणी समाज - महिला नावीन्यपूर्ण उपक्रम-भिशी तसेच इतर उपक्रम  या विषयक माहिती उरुळीकांचन येथील समाजभगिनी  सौ.पुजाताई प्रियेश तोडकर यांनी दिली.   
                 
मुलींचे शिक्षण व महिलांच्या विविध माध्यमातून भूमिका व जबाबदाऱ्या* याविषयक मुद्देसूद व प्रभावी मार्गदर्शन वाल्हेकरवाडी पुणे येथील समाजभगिनी सौ.अलकाताई भरत घोडके(सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका) यांनी केले.
द्वितीय सत्रातील आयडल व प्रोफेशनल प्रॅक्टिकल मार्गदर्शन अर्थातच ब्युटी पार्लर व्यवसाय विषयक माहिती तसेच मेक अप लाईव्ह डेमो याचे सादरीकरण-उरुळीकांचन येथील ब्युटीशियन व मेकअप आर्टिस्ट सौ.स्वातीताई संजय खानोलकर (शेटे)यांनी केले. 

महिला बचतगट व्यवसाय कर्ज विषयक कर्ज विषयक सर्वांगीण माहिती तसेच घरगुती उद्योग व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध करून  देण्याबाबत मार्गदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिका  येथील समूहसंघटिका सौ.रेश्माताई पाटील मॅडम यांनी केले.

हॉटेल बोरूळ अतिथी-प्रेरणादायी यशोगाथा याचे सादरीकरण पुणे येथील समाजभगिनी सौ.मनिषाताई सचिन बोरूळ यांनी केले.

"महिला गृहउद्योग पदार्थ वस्तू विक्री स्टॉल" मध्ये सहभागी झालेल्या *रहाटणी, पुणे येथील समाज भगिनी सौ.पुजाताई अशोक बिडवे यांनी स्वतःचा व्यवसाय-सुबोध एंटरप्रायजेस-सेंद्रिय गुळ,गुळवडी, गुळ चहा,गुळ पावडर याविषयक सर्वांगीण माहिती उत्तमप्रकारे दिली.

महिला मेळावा-उद्योग व्यवसाय प्रशिक्षण शिबीर या विषयक स्व अभिप्राययुक्त मनोगत दौंड येथील समाजभगिनी *सौ.सुनिताताई आशिष गोलांडे यांनी व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या मनोगतातून, समन्वयक यांनी महिलांना, महिला मेळावाच्या माध्यमातून सामाजिक व वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल समन्वयक यांचे आभार मानले.तसेच भविष्यातील सर्वांगसुंदर सामाजिक कार्यासाठी समन्वयक टीमला शुभेच्छा दिल्या.

विविध ट्रस्ट व सामाजिक संघटना यामध्ये 50% महिला आरक्षण या तत्वाप्रमाणे,स्वतः महिलांनी पुढाकार घेऊन सामाजिक कार्यात सदैव सक्रिय रहावे असा मोलाचा सल्ला आपल्या मनोगतातून *श्री.विश्वासजी नगरे (पुणे) यांनी आपल्या मनोगातून दिला. 

महिला मेळावा यशस्वीते करिता मेहनत घेणाऱ्या व सर्व प्रकारचे सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधव व महिला भगिनी यांचे आभार शिरूर येथील समन्वयक श्री.भूषण विजय कडेकर मानले.तसेच त्यांनी पुढील महिला मेळावा एप्रिल/मे 2023 मध्ये अहमदनगर शहरात होईल,असे सर्व समन्वयक यांच्या वतीने घोषित करण्यात आले.
महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध देण्याच्या दृष्टीने आपल्या समाजातील किराणादुकानदार व व्यावसायिक यांना देखील या कार्यक्रमात सामावून घेतले जाईल असेही  त्यांनी यावेळी सांगितले.याप्रकारे द्वितीय(दुपार) सत्राची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test