Type Here to Get Search Results !

" महिला मेळावा 2023-पुणे-मकरसंक्रांत स्पेशल सत्र "

" महिला मेळावा 2023-पुणे-मकरसंक्रांत स्पेशल सत्र " 
"स्त्री म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती होय..!"


महिला मेळावा - मकरसंक्रांत स्पेशल सत्रातील ठळक घडामोडी...
पुणे प्रतिनिधी 
मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधत,कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक यांच्या वतीने महिला भगिनी करिता हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन महिला मेळाव्यात सायंकाळी 4.00 ते 5:00 या वेळेत करण्यात आले होते.यावेळी "मकरसंक्रांत वाण" म्हणून कुलवंत वाणी दिनदर्शिका 2023 तसेच तिळगूळ व तिळवडी(दौंड महिलाभगिनी सौ.सुनंदाताई गोलांडे निर्मित) व सौ.शुभदा विश्वास नगरे यांच्या वतीने सुगंधी उदबत्ती याचे वितरण उपस्थित महिला भगिनी यांना करण्यात आले.

महिला मेळावा कसा वाटला?* याविषयक अभिप्राय पत्रक याचे वितरण या सेशन मध्ये करण्यात आले.उपस्थित महिला भगिनी पैकी 85 महिला भगिनी यांनी अतिशय सुंदर असे अभिप्राय लिहून,अभिप्राय बॉक्स पेटी मध्ये जमा केले.लवकरच प्रातिनिधीक स्वरूपात सदर अभिप्राय सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रस्टच्या वतीने प्रसिद्ध केले जातील. 

सदर महिला मेळावा करिता,मेळावा पूर्व महिलांची प्रवेश नोंदणी करून घेणे,नोंदणी केलेल्या महिलांना प्रत्यक्ष फोन करून मेळावा दिवशी आमंत्रित करणे,तसेच महिला मेळावा करिता आलेल्या महिला भगिनी यांच्याशी आपुलकीने सवांद साधत त्यांचे यथोचित आदरतिथ्य करणे, महिला मेळावा करिता उपस्थित राहिलेल्या भगिनींना मेळावा नंतर फोन वरून संवाद साधत ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करणे ही सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पडणाऱ्या, महिला समन्वयक सौ.ज्योतीताई महेंद्र गोलांडे(दौंड),सौ.वृषालीताई जयंत सजगुरे(पुणे),सौ.पल्लवीताई केदार सिद्ध(श्रीगोंदा),सौ.सपनाताई विशाल तांबोळी(अहमदनगर),सौ.शिल्पताई नितीन होळकर(भूम) व सौ.पल्लवीताई शेखर खोले(औरंगाबाद) यांचे कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक शतशः आभार..!

 सदर महिला मेळावा करिता एकूण 153 महिला भगिनी 32 समाजबांधव उपस्थित होते.

पुनश्च एकदा,महिला मेळावा 2023-पुणे च्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या तसेच सदर मेळावा यशस्वीते करिता विविध माध्यमातून सहकार्य करून मेहनत घेणाऱ्या सर्व महिला भगिनी,समाजबांधव,समन्वयक यांचे कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक यांच्या वतीने शतशः मन:पूर्वक आभार..!


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test