इंदापूर ! माळी समाजाच्या मतांचा वापर केवळ स्वार्थासाठीच - सुधाकर बोराटे.
माळी समाज तालुक्यात तिसरा पर्याय निर्माण करणार.
इंदापूर : इंदापूर तालुक्यात माळी समाजाची संख्या तीसर्या क्रमांकावर आहे.परंतु समाजाचा वापर केवळ मतांपुरताच केला जात आहे.दोन्ही बाजुच्या नेत्यांकडुन माळी समाजाची कामे मार्गी लावण्या ऐवजी नूसती मुसकटदाबी सुरू आहे.गावकीच्या राजकारणात भाव भावकीला तीकीटाचे अमिष दाखवुन घराघरात वाद पेटविण्याचे काम हिरारीने होत असल्याने आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत माळी समाजाला वेगळा विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत फुले प्रहार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बोराटे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
इंदापूर शहरातील फुले प्रहार संघटनेच्या कार्यालयात पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली.त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सुधाकर बोराटे बोलत होते.पुढे बोलताना
ते म्हणाले की, तालुक्यातील माळी समाज हा राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनल्याचे चित्र आहे.माळी समाजाने ठरविले तर तालुक्याला तीसरा पर्याय मीळणे सहज शक्य आहे.परंतु समाजातील काही संधीसाधु नेतेमंडळी स्वत:ची पोळी भाजुन घेण्यासाठी समाज राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम करीत आहेत.अशा संधिसाधुंना समाजाने खड्यासारखे बाजुला सारून त्यांना त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आली असल्याचे सुधाकर बोराटे म्हणाले.
तालुक्यातील दोन्ही नेत्यांचे दोन डगरीवरील राजकारण आणि माळी समाजाचा केवळ मतदानापूरताच होत असलेला वापर यामुळे तालुक्यातील माळी समाजाची स्थिती दयनिय आहे.सुशिक्षित बेकारांची सख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु नेतेमंडळी मात्र जातीय समिकरणाचे राजकारण करून माळी समाजाला नुसते झुलवत ठेवण्याचे काम सरू आहे. माळी समाजाचा वापर केवळ निवडणुकीतील मतदानापुरता करून घेतला जात असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपराषद,जि.परिषद, पंचायत समीती,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माळी समाजाने ढोंगी नेत्यांना त्यांची जागा दाखवुन देण्यासाठी तीसरा पर्याय निर्माण करावा लागणार असल्याचे सुधाकर बोराटे म्हणाले.
यावेळी फुले प्रहार संघटनेच्या पश्चिंम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी रविंद्र म्हेत्रे (काझड), संजय शिवाजी राऊत(निमगाव केतकी) यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी, बबन यशवंत खराडे (निमगाव केतकी)यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी,तर धनंज काळे.(रोपळे-माढा)यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या प्रसंगी अॅड.नितिन राजगुरू, लहुजी शक्ति सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, बन सर, स्वराज न्युज चे मुख्य संपादक प्रकाश आरडे, विश्व 24 चे वार्ताहार अतुल सोनकांबळे, फले प्रहार प्रदेश युवक कार्याध्यक्ष गणेश जाधव,फुले प्रहार पश्चिंम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आशोकभाऊ देवकर इत्यादी प्रमुख
मान्यवर उपस्थित होते.