धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळाल्याने बारामतीत फटाके फोडून, पेढे वाटत जल्लोष...
बारामती - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला..
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे,उपजिल्हाप्रमुख देवेंद्र बनकर,वाहतूक जिल्हाप्रमुख दिगंबर पडकर,उपजिल्हाप्रमुख दत्ता गावडे पाटील,तालुका प्रमुख स्वप्नील जगताप,युवासेना तालुका प्रमुख अमोल देवकाते,शहर प्रमुख आदेश इंगुले,युवासेना शहर प्रमुख संदीप पवार,गणेश नवले,गणेश वनवे,कल्पनाताई जाधव,वृषालीताई जाधव, माजी नगरसेवक अरविंद बगाडे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.