सोमेश्वरनगर ! सती मालुबाई मंदिर  येथे महाशिरात्रीनिमित्त खिचडी वाटप.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सती मालुबाई मंदिर  हे  श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर माळवाडी नजीक असून येथे महाशिवरात्र  शनिवारी दि १८ रोजी येणाऱ्या भक्त भाविकांसाठी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था व पंचक्रोशीतीलग्रामस्थ यांच्या वतीने प्रसाद म्हणून खिचडी चे आयोजन करण्यात आले महाशिवरात्र निमित्त  प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर स्वयंभू शिवलिंग,करंजे चे दर्शन घेण्यासाठी विविध जिल्ह्यातून भाविकभक्त येत असतात त्याचप्रमाणे सोमेश्वर मंदिर नजीक असणाऱ्या सती मालुबाई मंदिरातही हे भाविक आवर्जून दर्शनासाठी येतात या अनुषंगाने श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था व ग्रामस्थ यांच्या वतीने खिचडीचे आयोजन करण्यात आले होते व येणाऱ्या भाविकांनी हे याचा मनसोक्त लाभ घेतला 
दर महिन्यातील  अमावस्या निमित्त सती मालुबाई मंदिर येथे नियोजित भक्तांनमार्फत भंडारा चे आयोजन असते भाविक भक्त  पुज्या आरती करत प्रसादाचा नेवैद्य ठेऊन मोठ्या मनोभावे सती मालुबाई मंदिर परिसरात  शिवभक्त प्रसाद घेत असतात .. 
■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ ■ 
दर अमावस्याला आम्ही मालुबाई मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतो ....श्री क्षेत्र मालुबाई मंदिर,करंजे  मंदिर होणारे काम  लवकर काम पूर्ण व्हावे ही च मालुबाई चरणी प्रार्थना आहे
भक्त-रोहित चंद्रकांत वेदपाठक
रा. नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर


  
  

