"हर हर महादेव" च्या गजरात विविध जिल्ह्यातील हजारो शिवभक्तांनी घेतले 'सोमेश्वर' दर्शन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसर महाशिवरात्रीनिमित्त  सोमेश्वर शिवलिंग दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या तर ..."हर हर महादेव " च्या गजरात  या दिवशी भाविक विविध जिल्ह्यातून करंजे येथील सोमेश्वर शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठ हजारोंच्या संख्येत आले होते..  मध्यरात्री ची महापूजा बारामती तालुका राष्ट्रवादी क अध्यक्ष संभाजी होळकर ,सोमेश्वर साखर कारखाना संचालक शैलेश रासकर,संग्राम सोरटे तसेच भक्तांमधून दीपक जाधव व पोलीस कर्मचारी मेजर साळुंखे यांच्या हस्ते पुजारी संभाजी भांडवलकर तर पुरोहित विनायक परांजपे, ऋषी घोलप व मुकेश भांडवलकर उपस्थित होते  तसेच महाशिवरात्र शनिवारी दि १८ रोजी दुपारी १२ ची अभिषेक पूजा वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे सपत्नीक यांच्या शुभहस्ते करण्यात आली अशी माहिती देवस्थान ट्रस्ट सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली.
 महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर शिवलिंग गाभारा द्राक्ष व विविध फळांनी सजला होता तर मंदिर गाभारा व मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट स्वयंभू पतसंस्था सोरटेवाडी यांच्यामार्फत करण्यात आली होती . त्याचप्रमाणे  आलेल्या शिवभक्तांसाठी दिवसभर खिचडी वाटप ओंकार फर्निचर वाघळवाडी यांच्यामार्फत करण्यात आले असून भाविक भक्तांमार्फत फळे,चक्की  स्वरूपात देण्यात आली,
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मिठाईवाले खेळणे पाळणे तसेच गृह उपयोगी विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल , हॉटेल, रसवंती गृहदुकाने  लागली असल्याने  मंदिर परिसर गजबजुन जात सोमेश्वर पंचक्रोशीतील महिला, बालगोपालांनी महाशिवरात्र यात्रेचा तीन वर्ष्यानी आनंद लुटला .
  आरोग्य विभाग होळ यांच्यामार्फत भाविकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या ,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्फत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
    देवस्थान ट्रस्ट करंजे यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत सुविधा भक्तनिवास ,पाणी, सुसज्ज पार्किंग सोय करण्यात आली होती यात्रेनिमित्त विविध जिल्ह्यातून ५० हजारांच्या वर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून सर्परूपी सोमनाथ प्रकट झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर यांनी दिली.
 


 
   

 

 
 
 
 
