Type Here to Get Search Results !

बारामती ! मोफत स्किन केअर सेमिनार ला महिलांचा प्रचंड प्रतिसाद..

बारामती ! मोफत स्किन केअर सेमिनार ला महिलांचा प्रचंड प्रतिसाद..
बारामती प्रतिनिधी - योद्धा महिला मंच व ट्युलिप ब्युटी अकॅडमी यांच्या वतीने मोफत स्किन केअर आणि ब्रायडल मेकअप मार्गदर्शन सेमिनार शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी आयोजित केला होता. या सेमिनारला दौंड, इंदापूर, फलटण, माळशिरस, अकलूज या परिसरातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने हा सेमिनार दोन सत्रात घेण्यात आला. या कार्यक्रमात 150 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी शुभांगी जामदार यांनी स्किन केअर, व स्किन प्रकार या विषयी मार्गदर्शन केले. तर शुभांगी शिर्के यांनी ऍडव्हान्स ब्रायडल मेकअप, एच डी आणि थ्री डी मेकअप याविषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले.

     या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा चेतनाचे प्रज्ञा काटे यांना आमंत्रित केले होते. यावेळी प्रज्ञा काटे यांनी बाल लैंगिक शोषण या विषयावर उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस जानाई टेक्सटाईल यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली होती.  हा कार्यक्रम ट्युलिप ब्युटी अकॅडमी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान समोर कसबा बारामती येथे आयोजित आला होता. सदर  कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता योद्धा महिला मंचच्या धनश्री भरते, स्वप्निता खामकर, नानासाहेब साळवे, योगेश नालंदे व ट्युलिप ब्युटी अकॅडमीचे शुभांगी जामदार, शुभांगी शिर्के व सर्व टीमने सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test