Type Here to Get Search Results !

लोणंद !....त्या हॉस्पिटलचा स्टाफ एकत्र आला आणि काही तासातच संपूर्ण परिसर चकाचक

लोणंद !....त्या हॉस्पिटलचा स्टाफ एकत्र आला आणि काही तासातच संपूर्ण परिसर चकाचक

लोणंद - लोणंद येथील प्रसिद्ध रेणुका हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ एकत्र येत हॉस्पिटल परिसर काही तासातच स्वच्छ केल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे  , आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूर कडे मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा असतो, यामध्ये बऱ्याच ठिकाणी माऊली पालखी पायी दिंडीचा मुक्काम हा ठरलेला असतो यामध्ये लोणंद मध्ये माऊलींचा  पालखी दिंडीचा मुक्काम दोन दिवस होता त्यामुळे माऊलींच्या पायी दिंडीतील संख्या नेहमीच अगण्य असते, ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यास आलेल्या पायी दिंडी मुक्कामी साठी संपूर्ण लोणंद शहर दोन दिवस गजबजलेला असतो त्यामध्ये पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेले भावीक भक्त  व विविध व्यवसायांची दुकाने ही मोठ्या संख्येने थाटलेली  असतात यामध्ये पाळणे ,खेळणे वाले,  मिठाईवाले ,हॉटेल अशा विविध कौटुंबिक वस्तूंचे दुकाने मोठ्या संख्येने लोणंद शहरात सर्वत्र थाटलेले असतात यामुळे गर्दी ही खूप होते व या व्यवसायामुळे परिसरात व्यवसायिकांचा ओला-वाळला कचराही मोठ्या प्रमाणावर पडलेला असतो...हे लक्षात येता  नगरपालिका ही स्वच्छतेसाठी नेहमीच सज्ज असते परंतु आपली एक जबाबदारी म्हणून लोणंद शहरातील रेणुका हॉस्पिटलचे डॉक्टर  रावखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली
 संपूर्ण स्टाफ एकत्र येत एक सामाजिक बांधिलकी जपत हॉस्पिटल सह सर्व परिसर त्यांनी काही तासातच एकत्रित स्वच्छ केला यामध्ये त्यांनी एक सामाजिक संदेशही दिला की प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवतो तसेच आपले हॉस्पिटल ,दुकान ,मेडिकल ,हॉटेल शेजारील परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर नक्कीच एक सामाजिक काम आपल्या हातून घडेल व लोणंद नगरपालिका च्या जबाबदारी बरोबर आपणही आपली जबाबदारी ओळखत परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे ..यामुळे.संसर्ग सदृश्य  हानिकारक आजार नागरिकांना होणार नाही याचीही दक्षता प्रत्येक नागरिकांनी व व्यवसायिकांनी घेतली पाहिजे असा सामाजिक संदेशही रेणुका हॉस्पिटल च्या माध्यमातून परिसर स्वच्छ करत दिला आहे त्यामुळे त्यांचे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test