Type Here to Get Search Results !

बारामती ! प्रशासकीय भवनास राजर्षी शाहूमहाराज नाव देण्याची मागणी

बारामती ! प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू
महाराज नाव देण्याची मागणी
बारामती - बारामती येथील प्रशासकीय भवनास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव तर
बारामती शासकीय आयुवेर्दिक कॉलेज हॉस्पिटल
ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे
नाव द्यावे या मागणीचे निवेदन (दि:३०) रोजी
मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे
यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते
अजित पवार यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र
शासनाने आमच्या मागणीची गंभीर पणे दखल
न घेतल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने बारामती
प्रशासकीय भवना समोर लक्षवेधी आंदोलन
करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे पुणे
जिल्हा महासचिव प्रशांत विष्णू सोनवणे यांनी
दिल्या आहे. त्या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष,
तुषार गायकवाड, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश
भोसले, बारामती तालुका महासचिव दत्तात्रय माने
उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test